Author: admin (page 1 of 2)

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 4

निगेटिव्ह मार्कींग

मित्र हो, राज्य सेवा परीक्षेला निगेटिव्ह मार्कींग असते. या निगेटिव्ह मार्कींगची मनात एक भीतीही बसलेली असते. निर्णय क्षमतेवरही प्रश्न वगळता सामान्य ज्ञान आणि कल चाचणी या दोन्ही पेपर करता कोणत्याही प्रश्नासाठी चुकीच्या उत्तरावर ३३% मार्क कापले जाणार आहेत.

साहजिकच आपण तर्क शास्त्राच्या आधारे यावर विचार केला तर काही प्रश्न ज्यात आपल्याला दोन पर्यायांपैकी एक पर्याय योग्य उत्तर असेल असे वाटतेय तेथे यश मिळण्याची ५० % शक्यता आहे. आणि जिथे तीन पैकी १ पर्याय योग्य पर्याय असेल तिथे उत्तर अचूक मिळण्याची शक्यता ३३% आहे. ३  प्रश्नांपैकी एक प्रश्न बरोबर आला तरी आपण ३३% अधिक मार्क मिळवू शकतो.

यातून कोणत्या शक्यता निर्माण होतात?

 1. आपल्याला उत्तर अचूक माहिती आहे. म्हणजेच उत्तराचे पूर्ण मार्क मिळण्याची १००% खात्री आहे. आपला attempt किती असावा हे ठरवण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा आकडा. प्रश्नपत्रिका सोडविताना प्रश्न फेऱ्यांमध्ये सोडवावेत.  पहिल्या फेरीत फक्त १००% खात्री असलेले प्रश्न सोडवावेत. एक फेरी पूर्ण झाली कि आपल्याला ही अंदाज येईल नेमके किती प्रश्न आपल्याला आले आहेत. जर या फेरीमधे समाधानकारक संख्येमध्ये प्रश्न सोडवता आले तर कमी जोखीम घेऊन उर्वरित प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला असा वाटलं मला प्रश्न अवघड जातायत परंतु इतरांना हे प्रश्न सोपे जातील तर मात्र आपल्याला इतर फेऱ्यांमध्ये प्रश्न संख्या वाढवावी लागेल.
 2. उत्तर दोन पर्यायांपैकी एक आहे असे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच उत्तराचे पूर्ण गुण मिळण्याची ५०% शक्यता आहे. सामान्यतः सराव परीक्षांमध्ये अशी परिस्थिती खूपच जास्त वेळा येत असेल तर आपल्याला रिव्हिजन ची आवश्यकता आहे हे समजून घ्या. आणि तसे अभ्यासाचे नियोजन करा. १० प्रश्न असे सोडविले तर स्टॅटिस्टिकस म्हणजेच संख्याशास्त्रानुसार  त्यातील ५ प्रश्न बरोबर यायला हवेत म्हणजेच ५ प्रश्नांचे उत्तर चुकले तरी ३.३३ प्रश्नांचे गन तुम्हाला फायदा मिळवीन देऊ शकतात.
 3. उत्तर तीन पर्यायांपैकी एक आहे (एक पर्याय नक्की उत्तर नाही, असे आपल्याला ठाऊक आहे). म्हणजेच उत्तराचे पूर्ण गुण मिळण्याची शक्यता आता ३३% आहे. १० प्रश्न आपण सोडवले तर संख्याशास्त्रानुसार त्यातले ३. ३३ प्रश्न बरोबर येतील. ६.६६ प्रश्नांवर निगेटिव्ह मार्कींग लागेल. म्हणजेच २ गुणांच्या प्रश्नाला तुम्हाला २. २७ मार्कांचा फायदा होईल. म्हणजेच या पर्यायाचा वापरही करण्यात तुमचा फायदा आहे.
 4. चार पर्यायांपैकी कोणते नक्की उत्तर आहे आपल्याला ठाऊक नाही. अंधारात बाण चालवायचा आहे. अशा ठिकाणी अचूक उत्तर येण्याची शक्यता केवळ २५% आहे. म्हणजे असे तुम्ही बारा प्रश्न सोडविले तर त्यापैकी बारा पैकी ३ प्रश्न बरोबर येतील व नऊ प्रश्न चुकतील. म्हणजेच विशेष फायदा होणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हे गणित स्टॅटिस्टिकस च्या आधारे मांडलेले आहे. असेच दर वेळेला होईल असे नव्हे. बाराच्या बारा प्रश्न चुकले असे होणार नाही तसंच सर्व च्या सर्व किंवा अगदी त्यापैकी ५०%  प्रश्न ही बरोबर येतील असे होणार नाही. यो दोन्ही टोकांचे भान आपल्याला ठेवावे लागेल. असे असले तरी असे प्रश्न टाळलेलेच बरे असे म्हणायला जागा आहे.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हा परिश्रमाबरोबरच स्मार्ट वर्क म्हणजेच तंत्रावर हुकूमत मिळविण्याचा परिणाम असतो. या तंत्रावर हुकूमत मिळविण्यासाठी सुद्धा परिश्रम करावे लागतील. वर दिलेलं विश्लेषण तुमच्या सराव परीक्षेत वापरून पहा त्यानुसार आपले तंत्र घोटवा. यश सहज मिळेल.

All The Best!!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 3

हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील हा तिसरा लेख. या लेखात आपण चर्चा करणार आहोत सामान्य ज्ञान आणि CSAT या विषयांच्या स्वरूपाची.

सामान्य ज्ञान या विषयाचा आवाका तसे पाहता खूपच मोठा. इतिहास, भूगोल, राज्यघटना, ग्राम प्रशासन, सामान्य विज्ञान, वाणिज्य, पर्यावरण आणि चालू घडामोडी अशा विविध विषयांचा मिळून सामान्य ज्ञान हा विषय बनतो. कुठल्याही एका विषयाची सखोल माहिती इथे विद्यार्थ्याला माहिती असणे अपेक्षित नसते मात्र वेगवेगळ्या विषयांची जास्तीत जास्त परंतु सामान्य माहिती मात्र त्याच्याकडे असण्याची अपेक्षा असते. या उलट CSAT (कल चाचणी) मध्ये मात्र तुम्ही अपरिचित अशा परिस्थितीतून किती लवकरात लवकर बाहेर येऊ शकता हे तपासून पाहिले जाते. या दोन्ही विषयांच्या हाताळणीत फरक आहे. एकंदर कट ऑफ चा विचार करता CSAT च्या पेपर मध्ये अधिकाधिक गुण मिळविणे गरजेचे आहे कारण सामान्य ज्ञान मध्ये १०० गुण  मिळविणे अवघड आहे परंतु CSAT मध्ये  मात्र १२० – १३० गुण मिळविण्याचा विचार करता येऊ शकतो.

सामान्य ज्ञान मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलेल्या चार पर्यायांमधून ओळखायचे आहे. सामान्य ज्ञान मध्ये कुठल्याही प्रश्नासाठी ढोबळ विचार केला तर तुम्हाला एकतर उत्तर माहित असते नाहीतर माहिती नसते. म्हणजेच त्यात खरेतर दोनच पर्याय तुमच्या समोर आहे. एकतर माहिती असलेल्या उत्तरावर टिक करणे अथवा प्रश्न सोडून देणे. बऱ्याचदा आपण त्यात तिसरा मार्ग शोधतो अंदाजे उत्तर शोधण्याचा. नक्की उत्तर माहित नसेल तरी सुद्धा योग्य आणि अचूक उत्तरांपर्यंत पोचणे शक्य आहे त्यावर आपण पुढच्या लेखामध्ये चर्चा करू.

उत्तम रिव्हिजन हा हमखास यशाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे परिक्षेला जाण्या अगोदर आपल्या किमान तीन रिव्हिजन होतील या कडे लक्ष द्या. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक ठरेल. अर्थात योग्य नियोजन आत्ता पासूनचे आणि रोजचे करायला हवे. यावरही आपण येत्या काही दिवसात चर्चा करणार आहोत. तूर्तास आपल्याला चांगली रिव्हिजन करायची आहे, एवढी खूणगाठ मनाशी बांधा. एकाच विषयाची १० पुस्तके वाचण्यापेक्षा एकच चांगले पुस्तक १० वेळा वाचले तर अधिक चांगले परिणाम मिळतील यावर विश्वास ठेवा.

CSAT मध्ये मात्र सामान्य ज्ञान पेक्षा वेगळी स्थिती आहे. तिथे तुम्हाला उत्तर आधी माहित असणे गरजेचे नाही तर  उत्तर शोधून काढावे लागते. इथे प्रश्न, तर्क आणि फॉर्म्युले यांच्या साहाय्याने तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेच्या पॅटर्नचा अभ्यास करून तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर कमी वेळेतही ते प्रश्न सहज सोडविता येतील. सामान्य ज्ञान मध्ये मार्क मिळविण्यासाठी पाठांतर, रिव्हिजनची आवश्यकता आहे तर CSAT मध्ये मार्क मिळविण्यासाठी सरावाची जास्त आवश्यकता आहे.

CSAT मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी काय असते यावर विचार करा आणि त्या प्रमाणे CSAT च्या अभ्यासाचे नियोजन करा. CSAT ची तयारी सुरु करतानाच विद्यार्थी गणिताचा बागुलबुवा समोर उभा करतात आणि मग CSAT पेपर कडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो. सकारात्मक पद्धतीने आणि ज्ञानावर आधारित विश्लेषणातून CSAT कडे पाहिले तर असे लक्षात येईल की आयोगाचा गणितावर फार भर नाही उलट आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता यावर अधिक भर आहे. याही घटकांवर आपण पुढील लेखांमध्ये अधिक सखोल चर्चा करणार आहोत. तूर्तास या विषयाची भीती बाळगण्यापेक्षा त्याच्या सरावावर भर द्या.

याचाच अर्थ असा कि प्रत्येक विषयानुरूप आपल्याला तयारीचा पॅटर्न बदलायला लागेल त्यावर अधिक चर्चा या नंतरच्या लेखांमध्ये आपण करणारच आहोत. हमखास यशाचा मार्ग हा योग्य विश्लेषण आणि त्यानुसार प्रयत्न याच माध्यमातून साध्य करता येतो. आपला परीक्षा पद्धतीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न असाच चालू ठेवू. तोपर्यंत प्रयत्न तुमचे अविरत चालू ठेवा…

शुभेच्छा!!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 2

हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील दुसरा लेख.

मूलतः परीक्षेचे स्वरूप आणि मागील कट ऑफ यावरून काय बोध घेता येईल याची उहापोह करणारा हा लेख.

परीक्षा पद्धती समजून घ्या

कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला त्या परीक्षेचे मर्म समजून घेणे आवश्यक ठरते. अगदी मूलभूत ढाच्यापासून ते विषयांच्या विश्लेषणापर्यंत. विषयाला सुरुवात करतानाच आधी राज्यसेवा परीक्षेचा ढाचा समजून घेऊ. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन विषयांची बनली आहे. सामान्य ज्ञान मध्ये १०० प्रश्न आणि २०० गुण आहेत तर CSAT मध्ये ८० प्रश्न आणि २०० गुण आहेत. याचा सरळ अर्थ असा की सामान्य ज्ञान च्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ मार्क आहेत तर CSAT च्या प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला निगेटिव्ह मार्कींग आहे. म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तराला ३३% मार्क कापले जातील. अर्थात तुमचा CSAT मध्ये एक प्रश्न चुकणं सामान्य ज्ञान मध्ये एक प्रश्न चुकण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. याची जाणीव मनात ठेवूनच आपण आपला attempt कुठल्या पेपर मध्ये नक्की किती ठेवायचा हे ठरवायला लागेल.

गेल्या वर्षी कट ऑफ किती होता? 

जो परीक्षेचा सखोल अभ्यास करतो आहे त्याला मागील काही वर्षांचा कट ऑफ काय होता हे नक्कीच माहिती माहिती पाहिजे. राज्य सेवा परीक्षेचा विचार करता मागील तीन वर्षात विविध कॅटेगरी करीता कट ऑफ खालील प्रमाणे होता.

State Services Prelims Cutoff Marks
  Category Subcategory 2015 2016 2017
Open General 125 153 189
1 Females 86 121 168
2 Sports 60 103 146
3 SC General 122 147 173
4 Females 98 135 160
5 ST General 92 119 148
6 Females 74 91 128
7 DT(A) General 109 153 180
8 NT(B) General 115 149 184
9 SBC General 106 153 182
10 NT(C ) General 125 153 189
11 NT(D) General 125 153 189
12 OBC General 125 153 189
13 Females 109 142 174
14 PH Hearing Impairment 100 125 137
15 Locomotor Disability 110 139 154

 

अर्थात यंदाच्या वर्षी आपला attempt किती असावा यासाठी नक्की एक आकडा सांगता येणार नाही. दर वर्षी एकंदर कट ऑफ वाढतो आहे. कट ऑफ वाढण्याची दोन तीन मुख्य कारणे सांगता येतील.

 • एकंदरच परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम पुस्तके आणि नोटस ची उपलब्धता
 • परीक्षेमध्ये काय विचारले जाईल याचा अंदाज बांधण्यात आलेले यश
 • विद्यार्थ्यांचा योग्य सराव

अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी. प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ काय असेल हे आधी सांगणे अवघड आहे. त्या वर्षी उपलब्ध असलेल्या जागा व त्यानुसार आयोगाकडून पूर्व परीक्षेतून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या हे एक महत्वाचे परिमाण असेल. आयोगाने साधारण पणे किती विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करायचे हे आधीच ठरवलेले असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच केलेल्या घोषणेप्रमाणे हा आकडा १२-१३ एकंदर रिक्त जागांच्या १२-१३ पट असतो. म्हणजे १०० जागांकरिता  १२०० ते १३०० विद्यार्थी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील. एकूण जागा कमी असतील तर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असेल. म्हणजेच त्यावर्षी कट ऑफ जास्त भरेल. यंदा कमी पदे भरली जाणार आहेत म्हणजे कट ऑफ अधिक असण्याची शक्यता आहे. राज्य सेवा यंदाच्या जाहिराती प्रमाणे ६९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्थात यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे   म्हणजेच साधारणपणे अवघ्या १२०० – १३०० उमेदवारांना मुख्य परीक्षेत निवडले जाईल. साहजिकच यंदा कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. दुसरे महत्वाचे परिमाण म्हणजे परीक्षेची काठीण्य पातळी. ती अधिक असेल तर साहजिकच कट ऑफ कमी येणार. त्यामुळे कट ऑफ अमुक इतका असेल व त्या नुसार माझा attempt अमुक इतका असावा असं गृहीत धरून विद्यार्थ्याने, परीक्षा द्यायच्या आधीच आपला attempt ठरवणं धोकादायक आहे. सचिन तेंडूलकर जसा गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटेपर्यंत कोणता फटका मारायचा हे ठरवत नसे तसाच आपणही प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंत attempt ठरवू नये.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे परीक्षा सोपी आहे की अवघड हे केवळ आपल्या संदर्भामध्ये न ओळखता इतर स्पर्धकांनाही ही परीक्षा सोपी जाणार आहे की अवघड असा विचार विद्यार्थ्याने करायला हवा. त्यामुळे आपली कामगिरी इतर स्पर्धकांच्या तुलनेत कशी आहे / असेल याचा विचार कायम करत रहाणं विद्यार्थ्यांनी शिकायला हवं. त्यासाठी सराव परीक्षांमध्ये आपल्या कामगिरीचे मूल्यमापन इतरांच्या तुलनेत कसे आहे हे ही तपासून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केवळ वैयक्तिक पातळीवर अभ्यास करून पूर्ण होत नाही.

या बरोबरच इतर अनुभवी स्पर्धक बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके, सराव परीक्षा यांचा आणि सुयोग्य तंत्राचा वापर करून आपली कामगिरी सुधारत असल्याचे लक्षात घ्यावे लागेल. टी २०  च्या उदयानंतर अनेक खेळाडूंना आपणही प्रसंगी ७-८ च नव्हे तर १० च्या रन रेट ने ही फलंदाजी करू शकतो याचे भान दिले. तसच अनुभवातून शिकणारे विद्यार्थी आपली कामगिरी सुधारत नेत एकंदर कट ऑफ वाढवत नेत असतात याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. स्वाभाविक स्पर्धेचं योग्य भान तुम्हाला अधिक चांगला उमेदवार बनवतं.

केवळ परीक्षार्थी न रहाता तंत्र आणि अभ्यास यात मेल साधत यशाचा मार्ग शोधायचा आपण प्रयत्न करतोय. या लेखमालेतून या संदर्भात अधिकाधिक चर्चा करीत राहू.

भावी यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 1

नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. एकूण ६९ पदांकरिता ही परीक्षा होईल. २९ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज  दाखल करता येतील. राज्यसेवा पूर्व परीक्षा यंदा ८ एप्रिल २०१८ ला होणार आहे. स्वाभाविकच जे अधिक जबाबदारीने आणि आधी पासून तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांकरिता अक्षरशः युद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झालीये. योग्य स्ट्रॅटेजी, भरपूर अभ्यास, जोडीला स्मार्ट वर्क आणि योग्य सराव या चार सूत्रांवरच यशाचे मजले उभे राहू शकतात. परीक्षा पास होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आधी विचार करूयात.

भूतकाळापासून बोध घ्या

सर्वप्रथम आपल्या भूतकाळापासून शिका परंतु त्यात अडकून राहू नका. विशेषतः जे पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकत नाहीत त्यांनी आपल्या मागच्या प्रयत्नांकडे डोळसपणे बघा. त्या वेळेस कोणत्या चुका झाल्या त्या या वर्षी परत होणार नाहीत याची काळजी घ्या.  गेल्या प्रयत्नात आपण सामान्य ज्ञान आणि CSAT या दोन्ही भागातून किती मार्क मिळवले याचे विश्लेषण करा. या दोन्ही घटकातून तुम्हाला  कोणत्या उपघटकातून कमी मार्क मिळालेत याचंही विश्लेषण करा.

आपले कोणते प्रश्न गेल्या वेळेस चुकलेत? ते का चुकले याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे. जे प्रश्न चुकले त्यात आपण अभ्यास केलेले परंतु ऐनवेळेस आठवले नाहीत असे प्रश्न असतील तर आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेतच काही चुका होतायत. सामान्यपणे अशावेळी दोन – तीन  प्रतिक्रिया स्वाभाविकपणे समोर येतात.

एक म्हणजे सगळा दोष आयोगावर टाकण्याचा प्रयत्न होतो. MPSC काहीही प्रश्न विचारते! अशा प्रश्नांची उत्तरे कुणालाच येणार नाहीत वगैरे वगैरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये १० टक्के तरी निदान असे प्रश्न असतातच ज्यांची उत्तरं कुणालाच येत नसतात. परंतु अवघड वाटलेला प्रत्येक प्रश्न या कॅटेगरीत टाकणं चुकीचं. विद्यार्थी आयोगाचीच अक्कल काढायला  लागतात. परंतु असे करून आपला काहीही फायदा होत नाही.

दुसरी प्रतिक्रिया असते म्हणजे थोडक्यात चुकलंय, नाहीतर आलंच  असतं. अशावेळेस थोडक्यात चुकलंय पासून १००% बरोबर आहे पर्यंतचा प्रवास आपल्याला निदान या वर्षी तरी करायलाच हवा. त्यासाठी काही गोष्टी तपासून पहा.

१. ज्या पुस्तकांचा / अथवा नोट्स चा वापर करताय त्यात प्रश्नात अपेक्षित असलेली माहिती आहे ना?

२. आपली रिव्हिजन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात होते का?

३. आपली अभ्यास पद्धती परीक्षेला पूरक आहे ना?

४. आपला प्रश्न सोडविण्याचा सराव योग्य प्रमाणात आहे ना?

या चारही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील याची काळजी घ्या.

हे विश्लेषण करताना सामान्यपणे आपला फोकस जे आलं नाही याकडेच राहतो आणि जे आले नाही त्यावर अधिकाधिक मेहनत करण्याकडे कल असतो. पण आपली बलस्थानं ओळखून त्याच्या आधारावर सुध्दा यश मिळविता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी मागील परीक्षेतील आपल्या परफॉर्मन्सचं  सुयोग्य विश्लेषण आवश्यक ठरेल.   आपली बलस्थानं सुरक्षित करून घेतलीत तर त्यातून आलेले प्रश्न हातून सुटणार नाहीत आणि निगेटिव्ह मार्कींगचा फटका बसणार नाही. आपल्या अभ्यासातले जे कच्चे दुवे आहेत त्यांना बळकट करून निदान त्यात सरासरी गुण पडतील याची काळजी घ्या.   Make your strong points strongest and weak points average!

स्पर्धापरीक्षेतील मागील अपयश हे पुढील यशाची पायरी बनायची असेल तर आपला भूतकाळ हा पायरीच्या दगडा प्रमाणे वापरायला हवा. म्हणून जिथे अडलो तिथे गांगरून जाऊन / घाबरून थांबू नका तर पुढे जाण्याचे मार्ग शोधा. यशाचा राजमार्ग त्यातच दडलेला असेल.

यश मिळविण्यासाठी काय करायचेय यावर ही चर्चा अशीच चालू ठेवू तोवर तुमच्या अभ्यासास योग्य दिशा मिळो हीच सदिच्छा!

All the best!!

Sharing is Caring..!

IBPS Clerk Prelim 2016 Analysis for Logical Reasoning

Hello dear students,

IBPS Clerk Prelim date is coming near day by day and you must be very busy in your preparations. But as they say “Work Smart not Hard”, it will be very beneficial for you to go through last year analysis for every subject.

Let us now get a quick look at last year analysis of Reasoning Ability for IBPS Clerk Prelim, 2017. Last year’s difficulty level of this section was Easy to Moderate. Each shift had a little deviation from others. But if you are looking at key topics then you should not miss this:-

 • Inequality / Syllogism
 • Puzzles
 • Sitting Arrangements
 • Coding Decoding
 • Alphanumeric Series
 • Miscellaneous (Direction Sense, Blood Relation, Calendar, etc)

Though each shift had different pattern some topics were common. E.g.Inequality/syllogism ,Series, Puzzles and Sitting Arrangements.

 

Topic

No of questions Difficulty Level
Circular Seating Arrangement
(8 People)
5 Moderate
Linear Seating Arrangement
(8 people sitting in a row facing North)
5 Moderate
Linear Seating Arrangement
(In 2 parallel rows- 4 people were facing North and 4 were facing South )
5 Moderate
Alpha-numeric Series 5 Easy-Moderate
Mathematical Inequalities 5 Easy-Moderate
Alphabet Coding 5 Moderate
Miscellaneous 5 Moderate

Reasoning

Level of this section was Easy to Moderate. Average attempt for this section was 20 to 25 last year. So keep this in mind and prepare accordingly.

Practice is the key to success! So keep practising and if you require any help or want some free demo tests you can contact us at dhruv.ias@gmail.com or fill inquiry form on this website.

All the best for your preparations!

-Ajinkya Jadhav

Sharing is Caring..!

MPSC Tentative Calendar 2018

एमपीएससी कडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातील. ठरल्याप्रमाणे दुय्यम सेवा (PSI/STI/ASST) आणि गट क सेवा यांची  पूर्व परीक्षा संयुक्त पद्धतीने घेतली जाईल. प्रत्येक परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा तपशील जाहिरातीद्वारे जाहीर केला जाईल.

TIME TABLE 2018 FINAL-1

Sharing is Caring..!

Analysis of IBPS Clerical Prelim 2016 for Quantitative Aptitude

Dear Students,

Dates for IBPS Clerical exams have been announced. They are scheduled on 2nd ,3rd , 9th and 10th December. You must be toiling hard by now and preparations must be in full swing. It’s important that you work hard but its more important that you work smarter. Analysis of IBPS Clerk exam is an important tool where in you can sharpen your preparations. To nail the success, you must be looking at the areas from where questions have been asked.

To add edge to your preparations we are sharing Last year analysis of Quantitative Aptitude and changes expected In 2017’s IBPS Clerk Preliminary exam.

Let us first know the changes IBPS has made for this subject by comparing two years’ notifications.

Though there is no change in Prelim’s pattern, Mains Pattern is bit changed by IBPS. Last year Mains had 200 questions for 200 marks but this year mains will have 190 questions for 200 marks.

Year Subject Questions Marks Time
2016 Quantitative Aptitude 40 50 30
2017 Quantitative Aptitude 50 50 45

It is Important is to note that there is no change in Prelims,  hence you have to solve 35 questions in 35 minutes. Let us take a look at last year analysis for Numerical Ability Section.

If you had attempted 15-20 questions last year, that could have been  be considered as a good attempt. The level of section was easy to moderate.

There was only one DI for 5 marks. Number Series was asked for 5 marks. Simplification Problems comprised 15 Marks and Miscellaneous chapters like Interest, Speed-Time-Distance, Average, Problems on Ages were asked for 10 Marks. To give you a good Idea let us take a quick look at pie chart below.

Pie chart for ,maths

So guys, do consider this analysis of IBPS Clerk Pre 2016 Numerical Ability section while preparing for this year. If you prepare these topics, 80 – 90 % of your questions would be covered and one should be ready to face 10 – 15 % deviations that IBPS might go for. IBPS changed pattern for PO’s English this year held on 7th, 8th, 14th and 15th October but there weren’t huge changes in Quantitative Aptitude.

We must have a look at sectional cut off as well for last year. It was a high scoring exam last year and over all cut off went as high as 65; and sectional cut off for quantitative aptitude was at 10.75. We need to secure thee many marks at least and wise candidate will try be safer in this context.

Practice is the key to success. One can keep a target of solving atleast 1000 questions from these sections. So keep on practicing, check your scores and stay ahead in the competition. To help you on this we have created a Free Online Test for IBPS Clerk Exam. You can write a mail to us at dhruv.ias@gmail.com or simply fill the contact form on this website.

All the best for your studies!

– Ajinkya Jadhav

Sharing is Caring..!

चालू घडामोडींची तयारी (राज्यसेवा PSI / STI/ ASST)

Untitled

अनेक विद्यार्थी ‘चालू घडामोडी’ या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि परीक्षेच्या २ ते ३ आठवडे आधी बाजारातील एखादे पुस्तक घेऊन त्यातूनच अभ्यास करून परीक्षा देतात. परंतु कमी वेळ देऊन अभ्यास केल्याने परीक्षेत त्यांना साफ निराशा येते. परीक्षेत साधारण पणे १०-१५ % महत्व हे चालू घडामोडींना आहे. आणि विद्यार्थी मात्र त्यासाठी १-२ % एवढाही वेळ देत नाहीत. चालू घडामोडी हा विषय २ – ३ आठवड्याच्या कक्षेत बसणारा विषय नाही. PSI/STI/ASST. किंवा अगदी राज्यसेवा परीक्षेत, चालू घडामोडी मध्ये तुम्ही योग्य नियोजन करून अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. त्यासाठी खालील मुद्द्यांवर भर दिला पाहिजे.

 • तुम्ही मागील एक वर्ष ते परीक्षेच्या २० – २५ दिवस आधीपर्यंत सर्व घडामोडी वाचणे अपेक्षित आहे. उदा.  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यातील घडामोडी, निधन वार्ता, नेमणुका, पुरस्कार    (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय), योजना,  क्रीडा, करार, निवडणुका, आर्थिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी इत्यादी.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांवर भर – जन-गण, पहल, आता पेन्शन योजना, मेक-इन-इंडिया, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया इत्यादी)
 • A B C D पद्धतीने अभ्यास करा. ही काही पोलीस भरती नाही किंवा तलाठी परीक्षा नाही कि थेट प्रश्न पडेल. उदा. आपण एखादी निधन वार्ता घेऊन पोलीस भरती/ तलाठी आदी परीक्षेत कसा प्रश्न पडेल ?

          प्रश्न.  बाल मुरली कृष्ण ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

पर्याय:         अ) क्रीडा       ब) संगीत        क) चित्रकला     ड) सहकार

         (उत्तर – ब- संगीत)

परंतु हाच प्रश्न PSI/STI/ASST. किंवा राज्यसेवा परीक्षेत कसा पडेल हे पहा.

प्रश्न.  बाल मुरली कृष्ण यांच्या बद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ) त्यांचे निधन २२ नोव्हेंबर, २०१६ रोजी झाले. वय(८६)

ब) त्यांना  खंजीरी, मृदंगम, वायोलिन, हि वाद्ये वाजवता येत होती.

क) ते कर्नाटकी संगीत यासाठी प्रचलित होते.

ड) त्यांना पद्माविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता.

पर्याय:         १. फक्त अ आणि ब        २. क, ड फक्त       ३. अ, ब, आणि क       ४. वरील सर्व

                     (उत्तर – ४ – वरील सर्व)

तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला केवळ वर-वर वाचून चालणार नाही तर पूर्ण माहिती घ्यावी लागेल. वरील सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तेव्हा तुम्हाला १ गुण मिळू शकतो. राज्यसेवा, PSI/STI/ASST. ला १५ पैकी १२ – १३ प्रश्न हे वरील म्हणजे A B C D आराखड्यावर आधारित असतात. आता यानुसार तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे हे तुम्ही निश्चित करायला हवे.

३. योग्य पुस्तक/ माध्यम:

१) वर्तमानपत्र :

 • लोकसत्ता हे वर्तमानपत्र दररोज वाचून त्यातील महत्वाचे मुद्दे A B C D पॅटर्न मध्ये काढायला लागा.
 • संपादकीय लेखांवर विशेष भर द्या.
 • वर्तमानपत्रातील वादग्रस्त मुद्दे वाचू नका (राजकीय).

२) मासिके :

 • लोकराज्य, योजना, परिक्रमा

३) महत्वाची पुस्तके –

 • ध्रुव अकॅडेमीच्या चालू घडामोडींवरील नोट्स (प्रा. अनिल घुगे)
 • चालू घडामोडी (मिथुन भोसले)

एवढी जरी तयारी केली तरी तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की, चालू घडामोडी या विषयासाठी तुम्ही तयार आहात. हा विषय ऑप्शनला टाकायचा विषय नव्हे किंवा एक दोन आठवड्यात होण्यासारखा विषय नव्हे. या विषयासाठी सातत्य आवश्यक आहे. जे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून देऊ शकते.

‘ उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली

अशांना करी लागती ना मशाली

रवि नित्य तेवे विना तेल वात

अशांची शिवाजी असे जन्म जात ‘ 

आपणही उत्तुंग यश मिळवण्याचा संकल्प करा. यश नक्की मिळेल. अपेक्षा करतो की तुम्हाला हा लेख तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी पडेल.आपला अभिप्राय कळवावा.

 

Sharing is Caring..!

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१७

maharashtra police

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१७ : भाग-१

दर वर्षी लाखो जण ज्या परीक्षांची वाट पाहत असतात, त्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या परीक्षा अखेरीस यंदा मार्च महिन्यात होणार आहेत.  तब्बल ७५० जागांसाठी या परीक्षा होणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र शासनाच्या गट – ब (अराजपत्रित) मध्ये मोडते. या वर्षी १२ मार्चला होणा-या परीक्षेसाठी तयारी कशी करता येईल, सर्वप्रथम परीक्षेत किती टप्पे आणि कुठले विषय असतात ते आपण पाहू.

पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा चार टप्प्यात होते.

परीक्षेचे टप्पे परीक्षेचे नाव विषय गुण प्रश्न कालावधी
पहिला टप्पा पूर्व परीक्षा सामान्य ज्ञान १०० गुण १०० १ तास
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा पेपर १

मराठी आणि इंग्रजी

१०० गुण ६० व ४०

एकूण १००

१ तास
पेपर २

सामान्य अध्ययन

१०० गुण १०० १ तास
तिसरा टप्पा शारीरिक चाचणी गोळाफेक, पुल अप्स, लांब उडी, धावणे १०० गुण
चौथा टप्पा मुलाखत ४० गुण

 परीक्षेचे स्वरूप

प्रथम आपण पूर्व परीक्षा या पहिल्या टप्प्याकडे पाहूया. पूर्व परीक्षा पास होण्याकरता कमीत कमी ४५ – ५० गुण मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही योग्य नियोजन करून विषयांचा अभ्यास केला तर तुम्ही हमखास पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. पूर्व परीक्षा हि चाचणी स्वरुपाची असते. या परीक्षेचे गुण निवड यादीत धरले जात नाहीत.

पूर्व परीक्षेचे असलेले विषय:

अनु.क्र. विषय प्राधान्य क्षेत्र अपेक्षित गुण
१. चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यातील घडामोडी (निधन वार्ता, नेमणुका, पुरस्कार, क्रीडा, करार, निवडणुका, आर्थिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी इत्यादी.

 

१५ गुण
२. इतिहास आधुनिक भारताचा इतिहास (१८५७ नंतर) विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

 

  १५ गुण
३. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी   १५ गुण
४. नागरिकशास्त्र भारतीय राज्यघटना, राज्य व्यवस्थापन(प्रशासन), पंचायतराज   १० गुण
५. अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी १५ गुण
६. सामान्य विज्ञान भौतिक शास्त्र (Physics), रसायन शास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology),वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene) १५ गुण
७. बुद्धीमत्ता चाचणी व अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक, बुध्यांक मापनाशी संबंधित प्रश्न १५ गुण

 

विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचे नियोजन योग्य प्रकारे केले की नक्कीच पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता. पुढील लेखामध्ये चालू घडामोडी या विषयाचे आकलन व परीक्षेच्या दृष्टीने कसा अभ्यास करता येईल व कोणती पुस्तके वापरता येतील हे आपण बघूया.

“ फक्त तीच स्वप्ने खरी नसतात

जी झोपताना बघितली जातात.

स्वप्न तर ती खरी ठरतात,

ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडता.’’

 

 • प्रा.अनिल घुगे (ध्रुव अकॅडमी)

Anil Ghuge

Sharing is Caring..!

ASHGABAT AGREEMENT

India gave its nod to become member of multilateral Ashgabat Agreement in March 2016. This move is considered as economically and strategically gainful. Ashgabat Agreement is an agreement to develop an International transport and transit corridor facilitating transportation of goods between Central Asia and Persian Gulf.

It is inked in 2011 by Oman, Iran, Turkmenistan and Uzbekistan and Qatar (which left in 2013) and later joined by Kazakhstan and now India .This is going to improve India’s trade and commercial relation with Eurasian region. Ashgabat agreement will further the connectivity though India funded International North South Transport Corridor (INSTC) and is logical outcome of India’s much talked Connect Central Asia Policy and Look West Policy. The Foreign Trade Policy 2015-20 also emphasises on enhancing trade with Central Asian and Eurasian region which includes many economically and strategically important countries like Iran, Afghanistan, Turkmenistan and so on for India.

Agreement is a step to re-energise ties with Iran which 5th largest oil supplier to India following the lifting of sanctions and also will complement to the eco-strategically important Chhabahar port in Iran. Strategically it will place India in equivalent position with respect to China’s OBOR initiative and China-Pakistan Economic Corridor.

This agreement is useful in diversifying India’s trade and ensuring energy-security and transit to EU. Central Asian region can become important block in India’s march to gain deserved position in international fora and organisations.

INSTC: – It is a multi-modal trade transport network that includes rail, road, and water transport from Mumbai in India via Bandar Abbas in Iran to Moscow in Russia. The concept was initiated by Russia, India and Iran in September 2000 to establish transportation networks among the member states and to enhance connectivity with the land locked region of Central Asia. The INSTC envisages movement of goods from Mumbai (India) to Bandar Abbas (Iran) by sea, from Bandar Abbas to Bandar-e-Anzali (an Iranian port on the Caspian Sea) by road, and then from Bandar-e-Anzali to Astrakhan (a Caspian port in the Russian Federation) by ship across the Caspian Sea, and thereafter from Astrakhan to other regions of the Russian Federation and further into Europe by Russian railways. INSTC could facilitate India’s economic integration with Eurasian economies and other countries in surrounding regions.

Shashank Lakhote

Sharing is Caring..!
Older posts

© 2018 Blog