Untitled

अनेक विद्यार्थी ‘चालू घडामोडी’ या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि परीक्षेच्या २ ते ३ आठवडे आधी बाजारातील एखादे पुस्तक घेऊन त्यातूनच अभ्यास करून परीक्षा देतात. परंतु कमी वेळ देऊन अभ्यास केल्याने परीक्षेत त्यांना साफ निराशा येते. परीक्षेत साधारण पणे १०-१५ % महत्व हे चालू घडामोडींना आहे. आणि विद्यार्थी मात्र त्यासाठी १-२ % एवढाही वेळ देत नाहीत. चालू घडामोडी हा विषय २ – ३ आठवड्याच्या कक्षेत बसणारा विषय नाही. PSI/STI/ASST. किंवा अगदी राज्यसेवा परीक्षेत, चालू घडामोडी मध्ये तुम्ही योग्य नियोजन करून अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. त्यासाठी खालील मुद्द्यांवर भर दिला पाहिजे.

  • तुम्ही मागील एक वर्ष ते परीक्षेच्या २० – २५ दिवस आधीपर्यंत सर्व घडामोडी वाचणे अपेक्षित आहे. उदा.  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यातील घडामोडी, निधन वार्ता, नेमणुका, पुरस्कार    (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय), योजना,  क्रीडा, करार, निवडणुका, आर्थिक घडामोडी, वैज्ञानिक घडामोडी इत्यादी.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांवर भर – जन-गण, पहल, आता पेन्शन योजना, मेक-इन-इंडिया, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया इत्यादी)
  • A B C D पद्धतीने अभ्यास करा. ही काही पोलीस भरती नाही किंवा तलाठी परीक्षा नाही कि थेट प्रश्न पडेल. उदा. आपण एखादी निधन वार्ता घेऊन पोलीस भरती/ तलाठी आदी परीक्षेत कसा प्रश्न पडेल ?

          प्रश्न.  बाल मुरली कृष्ण ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

पर्याय:         अ) क्रीडा       ब) संगीत        क) चित्रकला     ड) सहकार

         (उत्तर – ब- संगीत)

परंतु हाच प्रश्न PSI/STI/ASST. किंवा राज्यसेवा परीक्षेत कसा पडेल हे पहा.

प्रश्न.  बाल मुरली कृष्ण यांच्या बद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ) त्यांचे निधन २२ नोव्हेंबर, २०१६ रोजी झाले. वय(८६)

ब) त्यांना  खंजीरी, मृदंगम, वायोलिन, हि वाद्ये वाजवता येत होती.

क) ते कर्नाटकी संगीत यासाठी प्रचलित होते.

ड) त्यांना पद्माविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता.

पर्याय:         १. फक्त अ आणि ब        २. क, ड फक्त       ३. अ, ब, आणि क       ४. वरील सर्व

                     (उत्तर – ४ – वरील सर्व)

तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला केवळ वर-वर वाचून चालणार नाही तर पूर्ण माहिती घ्यावी लागेल. वरील सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तेव्हा तुम्हाला १ गुण मिळू शकतो. राज्यसेवा, PSI/STI/ASST. ला १५ पैकी १२ – १३ प्रश्न हे वरील म्हणजे A B C D आराखड्यावर आधारित असतात. आता यानुसार तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे हे तुम्ही निश्चित करायला हवे.

३. योग्य पुस्तक/ माध्यम:

१) वर्तमानपत्र :

  • लोकसत्ता हे वर्तमानपत्र दररोज वाचून त्यातील महत्वाचे मुद्दे A B C D पॅटर्न मध्ये काढायला लागा.
  • संपादकीय लेखांवर विशेष भर द्या.
  • वर्तमानपत्रातील वादग्रस्त मुद्दे वाचू नका (राजकीय).

२) मासिके :

  • लोकराज्य, योजना, परिक्रमा

३) महत्वाची पुस्तके –

  • ध्रुव अकॅडेमीच्या चालू घडामोडींवरील नोट्स (प्रा. अनिल घुगे)
  • चालू घडामोडी (मिथुन भोसले)

एवढी जरी तयारी केली तरी तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की, चालू घडामोडी या विषयासाठी तुम्ही तयार आहात. हा विषय ऑप्शनला टाकायचा विषय नव्हे किंवा एक दोन आठवड्यात होण्यासारखा विषय नव्हे. या विषयासाठी सातत्य आवश्यक आहे. जे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून देऊ शकते.

‘ उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली

अशांना करी लागती ना मशाली

रवि नित्य तेवे विना तेल वात

अशांची शिवाजी असे जन्म जात ‘ 

आपणही उत्तुंग यश मिळवण्याचा संकल्प करा. यश नक्की मिळेल. अपेक्षा करतो की तुम्हाला हा लेख तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी पडेल.आपला अभिप्राय कळवावा.

 

Sharing is Caring..!