Page 2 of 2

Do’s and Don’ts for Civil Services Main Exams

Students, those who are appearing for Civil Services Mains exam, must be completing their preparations by now. For once it must be understood that preparation for mains is never over as such. But at one point, one must understand that, you should start consolidating by now. Its last month of preparations, you must tell yourself that whatever that you have studied earlier must be revised now. Entire syllabus be it, of General studies, or of optional subject, must be revised thoroughly. In fact somebody might think of 20 – 5 – 2 days formula to revise syllabus thrice in last month.

Also one should be looking forward to write two – three answers a day in a given timeframe of 9 minutes. Thinking of attempts, we must understand that you cannot answer all 20 questions with equal ease. So my suggestion would be to focus on 12 -13 questions with confidence and 3-4 questions with some workout. It would be ok to leave out 2-3 questions completely. You would like to mention certain points if you can link up the given questions to something you know. But otherwise try to put in more where you can fetch more marks. Try at least twice, to write two entire tests in one day. For matter of practice, we would be putting up some questions, which might be relevant for Civil Services Mains 2016.

In last month, it’s vital to keep your health, so don’t drink water and eat food from unhealthy or unreliable sources. To have a sound and enough sleep is also mandatory. If you sleep during afternoon, this is the time to give up that habit. You must be fully awake and alert in examination hours for at least 3 weeks. Preparing yourself for that is also a part of preparations. These are going to be most crucial days of your life, let’s give them due importance and do all those things which winners would do. After all it’s all about that: ‘Being a winner all the time’

All the bests!!!

Vinod Deshpande

Director

Dhruv IAS Academy

Sharing is Caring..!

MPSC

MPSC च्या परीक्षांनी वेळापत्रक पाळावे म्हणून कितीजणांनी देव पाण्यात ठेवले असतील. कितीतरी विद्यार्थी डोळ्यात प्राण आणून वाट पहात होते. अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असणार यात शंका नाही. पण अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवसाला पावला म्हणायचा. कारण ३ नोव्हेंबर ला MPSC ने विक्रीकर निरीक्षक पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चांगल्या १८१ जागांसाठी २९ जानेवारीला परीक्षा घेतली जाईल. गेल्या २-३ वर्षांच्या तुलनेत ही संख्या घसघशीतच म्हणायला हवी. देर आये लेकीन दुरुस्त आये अशीच भावना अनेकांची झाली असेल. काही प्रमाणात विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा परिणाम म्हणून आंदोलने होताना दिसत होती. आता हे विद्यार्थी परत एकदा अभ्यासाला लागतील. विक्रीकर निरीक्षक पाठोपाठ गेली दोन वर्षे वाट पहात असलेली पोलीस उपनिरीक्षक आणि राज्यसेवा परीक्षासुद्धा येतील अशी अपेक्षा आहे. अर्थात रणनीतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी केवळ विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा  अभ्यास असा विषय न ठेवता राज्यसेवा परीक्षा त्यानंतर काही महिन्यातच येण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून अभ्यासाचे नियोजन करावे. यादृष्टीने येत्या काही दिवसात या लेखमालेतून मार्गदर्शन केले जाईलच. पण तूर्तास तरी विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा विचार अधिक गांभीर्याने करणे भाग आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

विक्रीकर निरीक्षक परीक्षा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दिनांक ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१६

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट: https://mahampsc.mahaonline.gov.in

ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : २३ नोव्हेंबर २०१६ रात्री ११.५९ पर्यंत

चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : २४ नोव्हेंबर २०१६ (स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये)

शुल्क रुपये ३७३ /- अमागास उमेद्वारांकरीता आणि २७३/- मागास उमेद्वारांकरीता

एकूण पदसंख्या : १८१

एकूण खुला वर्ग : १०४

एकूण मागासवर्गीय: ७२

एकूण विकलांग : ५

परीक्षा दिनांक : २९ जानेवारी २०१६

नुकतीच पार पडलेली दिवाळी विद्यार्थ्याना पुरेशी विश्रांती देऊन गेले असेल. आता गरज आहे ती अंग झाडून अभ्यासाला लागण्याची. तेव्हा अभ्यासाला लागा. यशश्री खेचून आणायची असेल तर नियोजन बद्ध आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करायला हवा.

ऑल द बेस्ट!

विनोद देशपांडे

संचालक

ध्रुव आय. . एस. अकॅडमी

Sharing is Caring..!
Newer posts »

© 2018 Blog